सुलभ एकात्म मानव दर्शन – 01 - विनय पत्राळे

(सध्या केंद्र सरकारतर्फे पं. दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्ष चालू आहे. श्री.विनय सोमण यांचा  दीनदयाळजींचा थोडक्यात परिचय करून देणारा लेख आपण दोन आठवड्यापूर्वी ब्लॉगवर प्रकाशित केला आहे. दीनदयाळजी मांडलेले भारतीय चिंतनावर आधारित एकात्म मानव दर्शन हे राष्ट्रीय तत्त्वज्ञानही सोप्या भाषेत यावे असा विचार होऊन श्री. विनय पत्राळे यांच्या एकात्म मानव दर्शन या पुस्तकावर आधारित हे सुलभ एकात्म मानव दर्शन संक्षेपाने क्रमशः प्रकाशित करीत आहोत. – समन्वयक)

 प्रस्तावना
आपला भारत देश जगातील सर्वात प्राचीन राष्ट्र आहे. ऐहिक व पारलौकिक अशा दोन्ही आयामात आपल्या  पूर्वजांनी समृद्धि प्राप्त केली होती. एकीकडे प्राणीमात्र - वनस्पतिसृष्टमधे एकत्वाची अनुभूत करतानाच दुसरीकड़े कला, साहित्य, विज्ञान, व्यापार या ऐहिक बाबींचा सुद्धा उत्कर्ष साधला होता. विश्वभरातील विद्यार्थी नालंदा व तक्षशिला या प्राचीन भारतीय विद्यापीठांमध्ये शिक्षण प्राप्त करण्यासाठी येत असत. भारताने जगाला शून्याची देणगी दिली. इथली संस्कृत भाषा, योग, आयुर्वेद, नृत्य परंपरा, उत्सव इत्यादि, इथली परिवार व्यवस्था या सर्व गोष्टी जीवनांकड़े पाहण्याची एक सकारात्मक दृष्ट देतात. स्वामी विवेकानंदांच्या शब्दात सांगावयाचे झाले तर मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करणा-या प्रत्येक आत्म्याला ले अंतिम आश्रयस्थान जेथे करण्यासाठी यावेच लागेल अशी आत्मसंशोधनाची व अध्यात्माची भूमी म्हणजे आपला भारत देश!’

कालक्रमामध्ये जसे व्यक्तीच्या जीवनात चढाव-उतार येत असतात तसेच ते राष्ट्रीय जीवनात सुद्धा येतात. ग्रीक, हुण, शक, कुशाण यांच्यासारख्या आक्रमक शत्रूंना पराजित करून त्यांना येथील समाजजीवनात पचवून टाकण्याचा पुरुषार्थ करणारा आपला समाज त्यानंतर झालेल्या इस्लामच्या आक्रमणाने पार खिळखळा झाला. स्पेन, पुर्तगाल, फ्रांस यांनी भारतात त्याच्या वसाहती स्थापन केल्या. इंग्रजांची गुलामगिरी दीडशे वर्षे चालली. दीर्घकाळपर्यंत येथील राष्ट्रजीवन आत्मग्लानीच्या कालखंडातून  चालले होते.

1947 मधे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढे प्रगती व विकासाची कोणती दिशा असावी याबाबतीत फारसा सखोल विचार झाला नाहीं. ज्यांनी आपल्यावर राज्य केले त्यांची आंधळी नक्कल करण्याची स्पर्धा सुरु झाली. आपल्या स्वतःच्या अस्मितेचा व गौरवाचा विसर पडल्यामुळे जगात अन्यत्र चालणारे मतप्रवाह पर्याय म्हणून विचारार्थ पुढे आले. आपली स्वतःची जीवनदृष्टि, त्या आधारित दीर्घकाळपर्यंत टिकून राहिलेले आपले राष्ट्रजीवन वगैर बाबींचा अभ्यास न करता स्व-विरहित विकासनीतीचा अवलंब करण्यात आला.

स्वामी विवेकानंदांना जेव्हा पाश्चिमात्य विद्वान म्हणाले की तुमचे आध्यात्मिक ज्ञान तुम्ही आम्हाला द्या व त्याच्या बदलात आमचे समाजवादा सारखे आधुनिक विचार स्वीकारा तेव्हा स्वामीनी त्यांना उत्तर दिले की अहो! तुमच्या विचारांवर आधारित समाजरचना करून तुम्ही ती 500  वर्षांपर्यंत तर चालवून दाखवा... मग बघू!”

पाचशे वर्षे दूर राहिली, 50 वर्षांमधेच कम्युनिस्ट विचारांचा पाया ढासळला. रशियाची शकलं झालीत.... चीनने कम्युनिझमशी नाते तोड़ले....

इकबालने लिहिलेल्या सारे जहां से अच्छा या गीतामध्ये एक ओळ अशी आहे कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी. ही कुछ बात काय आहे ते शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यानंतर राजेशाही की लोकशाही, भांडवलशाही की कम्युनिझम, रशियन मॉडेल की अमेरिकन मॉडेल... यावर विचार करता येईल.

भारतीय चिंतनाच्या, प्रकृतिस्वभावाच्या आधारावर पन्नास वर्षापूर्वी पंडित दीनदया उपाध्याय यांनी एकात्म मानव दर्शनाचा विचार प्रस्तुत केला. त्याचे विविध आयाम कार्यकर्त्यांपुढे मांडले.

पंडितजींचे विचार त्यातील सार कायम ठेऊन सोप्या शब्दात मांडण्याची कल्पना आली. त्यांच्या जन्मशताब्दीचे व एकात्म मानव दर्शनाच्या सुवर्ण जयंतीचे निमित्त साधून हा ल्रेखन प्रपंच आहे.

राज्यव्यवस्थेची कार्यशैली – सुयोग्य बदल आवश्यक -- अनिल जवळेकर

उत्तराखंड उच्च न्यायालयाने तेथील सरकारला श्रीमंती थाटाच्या मोटारवाहनासारख्या वस्तू सरकारी उपयोगासाठी विकत घेण्याचे मना केले असल्याची बातमी बहुतेकांनी वाचली असेलच. कारण तेथील सरकार शाळांची मूलभूत गरज पुरवू शकणार्‍या वस्तू जसे कि बेंचेस, ब्लॅकबोर्ड्स आदींची व्यवस्था करण्यास अपुरे पडत होते. नुक्तेच न्यायालयाने संबंधित अधिकार्‍यांचा पगारही गरज पडल्यास थांबवण्याचा आदेश दिले आहेत. सरकारांना काय करावे हे सांगण्याची पाळी न्यायव्यवस्थेवर यावी यातच बरेच काही येऊन जाते. आजकाल अशा घटना वाढत असताना दिसतात. ह्याला काही जण सरकारी कामात हस्तक्षेपही मानतात. पण राज्यव्यवस्थेच्या कामाची शैली बदल्यामुळे असे होत आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.

राज्यव्यवस्थेची कार्यशैली जुन्या काळी प्रजेच्या हिता पेक्षा राजाच्या हिताचा विचार करणारी होती आणि आजच्या काळात लोकशाहीचा स्वीकार झाल्या मुळे लोकहिताचा विचार करणारी अपेक्षित आहे. गेल्या साठ एक वर्षाचा भारतीय लोकशाहीचा अनुभव पाहता असे म्हणता येते की राज्यव्यवस्थेची कार्यशैली लोकहिता कडून लोकानुनयाकडे वळत आहे. निवडून येण्याच्या दृष्टीने उपयोगी असे समाजातील विशिष्ट वर्ग यात महत्त्वाचे होऊन बसत आहेत व मतदारांच्या वाटण्या करून गरजेनुसार त्यांना लुभावण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला जात आहे. भारतातील जातीव्यवस्था व भिन्न धर्म यात उपयोगी पडत आहेत हेही आता लपलेले नाही. सरकारद्वारे विशिष्ट वर्गाला लाभ पोहचू शकणार्‍या कल्याणकारी योजनांचा अवलंब याचाच एक भाग म्हणता येईल. ह्या सर्वाचा परिपाक राज्यव्यवस्थेची कार्यशैली सतत तात्पुरती उपाय योजना करण्यावर केंद्रित झालेली दिसते. ह्याचाच परिणाम म्हणून जनतेच्या न्यायव्यवस्थेकडून लोकहितानुकूल निर्णयाच्या अपेक्षा वाढत असल्याचे दिसते. न्याय व्यवस्था राज्यव्यवस्थेच्या लोकानुनय कार्यशैलीला नियंत्रित करू शकेल असे वाटण्याला मात्र आधार नाही.

जगाच्या इतिहासाकडे नजर टाकली तर असे लक्षात येते कि राज्यव्यवस्थेला नियंत्रित करणारी एक मोठी शक्ती सर्वच देशात होती ती म्हणजे धर्मसंस्था. राजापेक्षाही मोठी मानली जाणारी ही शक्ती एके काळी अंतिम मानली जायची. युरोपात राज्य व धर्म व्यवस्थांमधील झालेला संघर्ष व राज्यव्यवस्थेने धर्मव्यवस्थेला मागे टाकले हा इतिहास सर्वश्रुत आहे. याला भारत मात्र अपवाद होता. भारतात राज्यव्यवस्था व धर्म संस्था यात तसा संघर्ष झाला नाही कारण भारतात संघर्ष करण्यासाठी शासक अशी धर्मसत्ता कधीच नव्हती. धर्मसंस्थेचे स्वरूप प्रामुख्याने नैतिक मार्गदर्शन व आग्रह असे होते. येथे धर्मशास्त्र होते व राजधर्माची व्याख्या सांगू शकणारी अनासक्त असणा-या ज्ञानी व विद्वानांची परंपरा होती. त्यात जसा कुणी एकच एक ज्ञानी वा विद्वान नव्हता तसा एकच एक ग्रंथही नव्हता. भारतातील धर्म हा जीवन रहस्य उलगडणारा व समाजाची धारण करू शकणारी सूत्रे सांगणारा होता आणि हे रहस्य व ही सूत्रे कुणा एका राजासाठी नव्हती तर राज्यसंस्थेच्या सर्वच घटकासाठी होती व प्रजेसाठीही होती. त्यात लोकहिताच्या दृष्टीने समाजधारणेचा व राजधर्माच्या पालनाचा फक्त आग्रह होता हे समजून घेतले पाहिजे. कारण असाच आग्रह म. गांधी व पं. दीनदयाळजींनीही धरला होता कारण दोघांनाही एकात्मतेचा विचार करणारे भारतीय चिंतन उपयोगी वाटत होते. स्वातंत्र्या नंतर भारतीय राज्यघटनेने राष्ट्रव्यवहारासाठी मार्गदर्शक अशा धर्मशास्त्राच्या कालानुरूप भागाची जागा घेणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. लोकप्रतिनिधी व शासनव्यवस्थेने राज्यघटनेला तसे खरेखुरे महत्वाचे स्थान कधी दिले नाही. लोकानुनयातून स्वार्थ साधणे चालू राहिले. व्यापक समाज जिला मानतो अशी राज्यव्यवस्थेपेक्षा मोठी शक्ती असणे गरजेचे आहे आणि ही शक्ती असल्याशिवाय लोकहिताची कार्यशैली राज्यव्यवस्थेकडून स्वीकारली जाणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. अशी शक्ती धर्मसूत्रे आपल्या जीवनात उतरवणा-या अनासक्त त्यागी ज्ञानी विद्वानांचीच असू शकते. सध्या तरी भारतात अशी परंपरा खंडित झाल्या सारखी वाटते. पण मधून मधून तिचे उन्मेष दिसतातही. तिचे सशक्तीकरण कदाचित भारताला भविष्यात तारू शकेल.

पं. दीनदयाळ उपाध्याय - विनय सोमण

पंडित दीनदयाळ भगवतीप्रसाद उपाध्याय (जन्म 1916 - मृत्यू 1968) हे आधुनिक भारतातील एक थोर विचारक होत ज्यांनी "एकात्म मानव दर्शन" ह्या विषयाची मांडणी केली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व सध्याच्या भारतीय जनता पक्षाचा पूर्वीचा अवतार मानल्या जाणाऱ्या "भारतीय जनसंघाचे" कार्यकर्ता होते. सांप्रतचे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे (25 सप्टें. 2016 ते 25 सप्टें. 2017) वर्ष आहे.

कुशाग्र बुद्धी व तरल संवेदना घेऊन दीनदयाळजी राजस्थानातील धनकिया या छोट्या गावात आजोळी रामप्यारी यांच्या पोटी जन्मले. लहान वयातच माता व पित्याचं छत्र हरपल्यामुळे राजस्थानातील सीकर येथे आपल्या मामांकडे शिक्षणासाठी गेले. शालेय जीवनात अनेक पुरस्कार व शिष्यवृत्ती प्राप्त करीत त्यांनी कानपूर येथून B.A. संस्कृत व आग्रा येथून सुवर्णपदकासह M.A. English पूर्ण केले. तद्नंतर B.Ed. व M.Ed. ह्या परीक्षासुद्धा उत्तीर्ण केल्या. १९३७ साली कानपूर येथेच त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी परिचय झाला. पू. डॉ. हेडगेवारांशीही कानपूर येथेच त्यांची गाठ-भेट झाली आणि अनेकांचे जे होत असे तेच त्यांचेही झाले. आपले जीवनसर्वस्व संघकार्याच्या माध्यमातून मातृभूमीच्या सेवेसाठी देण्याचे त्यांनी ठरवले.

तरुणांनी आपल्या क्षमतेचा उपयोग मातृभूमीच्या सेवेसाठी केला पाहिजे, अशी त्यांची नेहमी तळमळ असायची. एकदा कानपूर मधल्या एका संघशाखेची जबाबदारी श्री. शांतीदेवांनी घ्यावी असे ठरले. पण शांतीदेवांचा बासरी शिकण्याचा वर्ग व शाखेची वेळ एकच असल्याने "आपल्याला शाखा चालवणे जमणार नाही" असे सांगायला शांतिदेव संघ कार्यालयात गेले. तेव्हा पंडितजी आपले कपडे धूत होते. शांतीदेवांचे बोलणे ऐकल्यावर पंडितजी शांतपणे म्हणाले, "बरोबर आहे शांती. तू बासरी शिकच. जेव्हा देश जळेल तेव्हा कोणीतरी बासरी वाजवणारा लागेलच ना!"

पहिल्या संघबंदीनंतर संसदेत संघाची बाजू मांडणारे कोणीतरी असावे, असा विचार पुढे आला. त्याचवेळी पं. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली होती. "श्री" गुरुजींच्या (रा.स्व.संघाचे द्वितीय सरसंघचालक) बरोबर त्यांची चर्चा झाल्यावर "श्री"गुरुजींनी दीनदयाळजी, अटलजी व नानाजी देशमुख ह्या संघ प्रचारकांना जनसंघाच्या कामात सहभागी होण्यास सांगितले. दीनदयाळजींची तल्लख बुद्धिमत्ता, विचारांची स्पष्टता, अजातशत्रु स्वभाव यांमुळे श्यामाप्रसाद अत्यंत प्रभावित झाले. ते म्हणत, "असे आणखी दोन दीनदयाळ मला मिळाले तर देशाचे राजकीय भविष्य मी बदलून टाकीन."

पंडितजींनी जनसंघाच्या माध्यमातून मूल्याधिष्ठीत राजकारणाला भारतीय वातावरणात स्थान प्राप्त करून दिले. एकदा लखनऊ च्या नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी चालू होती. एका ब्राह्मणबहुल मतदारसंघात दीनदयाळजींनी उमेदवारी अर्ज भरावा असे सुचवले गेले. "पंडितजी, तुमच्या नावाच्या मागे 'पंडित' आणि पुढे 'उपाध्याय'. ह्या मतदारसंघात आपला विजय निश्चित आहे." पंडितजी उत्तरले, "तसे झाले तर मी विजयी होईन, पण जनसंघ पराभूत होईल." कार्यकर्त्यांनी सार्वजनिक जीवनात शुचिता आणि पावित्र्य राखण्यावर त्यांचा विशेष भर असे. एकदा एकाने प्रश्न विचारला की, "निवडणुकीत विजयी झालेल्या जनसंघाच्या उमेदवारांनी जर भ्रष्टाचार केला तर?". पंडितजी विनाविलंब उत्तरले, "असे झाले तर मी तो भ्रष्ट जनसंघ विसर्जित करीन आणि नवीन पक्ष निर्माण करीन." निवडणुकीतील जय-पराजय त्यांच्यासाठी फार महत्वाचे नव्हते. कारण "सत्ता हे 'अंत्योदय' साध्य करण्याकरता एक साधनमात्र आहे" असे ते मानीत. जेव्हा सत्ता हे साधन न रहाता, सत्ता हेच साध्य बनते, तेव्हाच अध:पतनाला सुरवात होते.

"एकात्म मानव दर्शनाची" मांडणी हे तत्वज्ञ दीनदयाळजींचे सर्वात मोठे योगदान होय. आजच्या जगातील सर्व मानवी प्रश्नांना सोडवण्याचे सामर्थ्य ह्या दर्शनात आहे. "अंत्योदयाची" इच्छा बाळगणाऱ्यांनी ह्या तत्वज्ञानाचा अवश्य अभ्यास करावा. १९६५ मध्ये तत्कालीन जनसंघाने ह्या "दर्शनाचा" जनसंघाची नीती म्हणून स्वीकार केला. ह्या "दर्शनाचा" मला समजलेला अर्थ असा -

"मनुष्य किंवा कोणीही सजीव-निर्जीव वस्तू ही संपूर्ण विश्वाचा एक घटक आहे. ह्या विश्वाशिवाय व त्यातील अन्य घटकांशिवाय व्यक्तीचे स्वतंत्र अस्तित्व अशक्य आहे. जसा मी एक व्यक्ती ह्या विश्वाचा घटक आहे, तसेच समोरच्या रस्त्यावरचा तो भिकारी किंवा त्याच्या बाजूला झोपलेला कुत्रासुद्धा ह्या विश्वाचे तितकेच महत्वाचे घटक आहेत. एका समान एकत्वाच्या सूत्राने सर्व चराचर बांधले गेले आहे. त्याला आत्मा वा ब्रह्म म्हटले आहे. व्यक्ती, कुटुंब, समाज, देश, विश्व, ब्रह्माण्ड अशा सर्वांना जोडणारे हेच एक समान सूत्र आहे. हे भारतीय चिंतनाचे सार आहे. त्यामुळेच मानवी समस्यांचा विचार तुकडया-तुकड्यांत न करता, ह्या संपूर्ण विश्वाच्या परिप्रेक्ष्यात करणे आवश्यक आहे." जिज्ञासूंनी हा विषय स्वतः: मुळातूनच वाचणे अधिक श्रेयस्कर ठरेल.

पंडितजी हाडाचे कार्यकर्ता होते. ते "श्री"गुरुजींना म्हणत, "गुरुजी, मला संघकामच मनापासून आवडते. तुम्ही मला ह्या राजकारणाच्या धकाधकीत का बरे अडकवले आहे?". "श्री"गुरुजी म्हणत, "अहो, तुम्हाला राजकारणात रस नाही म्हणूनच तुम्हाला ते काम दिले आहे. जेव्हा तुम्हाला राजकारण आवडायला लागेल, तेव्हा मी तुम्हाला पुन्हा संघकामात आणीन."

१९५१ ते १९६८ अशा १७ वर्षांच्या कालावधीत पंडितजींनी जनसंघात "ह्ये हृदयींचें, ते हृदयीं" करून आपल्यासारखे अनेक कार्यकर्ते निर्माण केले. काँग्रेस च्या हिंदूविरोधी व प्रतिगामी राजकारणाला एक सशक्त पर्याय निर्माण करून भारतीय राजकारणाला एक नवीन दिशा देण्याच्या स्थितीत जनसंघ पोहोचत असतानाच "अजातशत्रू" दीनदयाळजींचा ११ फेब्रुवारी १९६८ रोजी उत्तर प्रदेशातील मुघलसराई स्थानकाजवळ रेल्वेच्या डब्यात संशयास्पद मृत्यू झाला. त्यांचे शव रेल्वेच्या रुळांवरून प्राप्त झाले. त्यांची हत्या करण्यात आली हे उघडंच होते, पण त्याची योग्य प्रकारे चौकशी झाली नाही. काही नेत्यांच्या हत्यांवर खेळले गेलेले गलिच्छ राजकारण आपल्या देशाने पाहिले आहे, आणि काही अशा नेत्यांच्या हत्या दडपल्या गेलेल्यासुद्धा पाहिल्या आहेत. दीनदयाळजींच्या पवित्र स्मृतीला त्रिवार वंदन !!!