भारतीय लोकशाहीतील राजेशाही - अनिल जवळेकर



श्री राहुल गांधीनी शेवटी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष व्हायचे ठरवले. एरवीही ते पद श्री राहुलजी शिवाय  कुणाला मिळणार नव्हतेच. भारतीय लोकशाहीची शोकांतिका येथेच म्हणावी लागेल. भारतीय लोकशाहीत राजेशाही राबवण्याचा प्रयोग भारतातील बहुतेक राजकीय पक्ष आणि त्यांचे राजकीय नेतृत्व करत आहेत असे म्हणणे भाग आहे. सर्व जग, त्यात भारतीय नव-स्वातंत्र्यवादीही आले, भारतीय लोकशाही यशस्वी झाल्याचे म्हणत असताना हा चिंतेचा विषय ठरावा. प्रश्न येतो तो हा कि मग निवडणूक नामांकन वगैरेची औपचारिकता तरी कशासाठी केली गेली?
              स्वातंत्र्यानंतर भारतीय नेतृत्वाने मोठ्या अभिमानाने संसदीय लोकशाही स्वीकारली व लोकांनी मताधिक्याने निवडून दिलेल्या नेतृत्वाकडून राज्यकारभार होईल अशी आशा बाळगली. राजकीय पक्ष उदय पावतील व ते लोकशाही हायजॅक करतील असे त्यांना वाटले असावे म्हणूनच कदाचित त्यांनी राजकीय पक्षांना राज्यघटनेत फारसे स्थान दिले नसावे. पण काळाला काही औरच मान्य होते. राजकीय पक्ष संख्येने उदंड झाले एवढेच नव्हे तर त्यांनी राजेशाहीतील घराणेशाही जिवंत ठेवली. भाजपा व साम्यवादी पक्ष सोडले तर बहुतेक पक्ष घराण्याशी जोडले असल्याचे चित्र आहे.
       एकात्म मानव दर्शनाचा विचार करतांना दीनदयाळजीनी राजकारण राष्ट्रनिर्माणासाठी करण्यावर भर दिला. राष्ट्रहितनिष्ठा ही सर्वोपरी व राजकीय निष्ठा ही दुय्यम असावी असा आग्रह धरला. आजचे भारतीय राजकारण राष्ट्रनिष्ठ असण्या एवजी व्यक्तीनिष्ठ व घराणेनिष्ठ होत चालले आहे असेच म्हणावे लागेल. राहुलजीचे पक्षाध्यक्ष होणे याला धरून आहे. पण यात फक्त कॉंग्रेस पक्षच आहे असे मानण्याचे कारण नाही. भाजपातही नेतृत्वात नसली तरी कार्यकर्त्यात घराणेशाही उतरत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे.
       भारतीय लोकशाहीचे निवडणुका हे एक प्रमुख अंग आहे आणि निवडणुकात ग्रामपंचायत पासून लोकसभे पर्यंत घराणेशाहीची मक्तेदारी होणे धोक्याचे म्हणावे लागेल. यासाठी निवडणुकीच्या प्रक्रियेत व एकंदरच अभिशासन (Governance) यात बराच बदल होणे गरजेचे आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी एकात्म मानव दर्शनाच्या प्रकाशात खालील बाबींचाही विचार केला पाहिजेः
1 केंद्र व प्रांत सरकारचा आकार व आवाका कमी करणे. सरकार करत असलेली अनेक कामें सामाजिक संघटनांनी करणे जशी ती पूर्वी आपल्या देशात केली जात होती उदा. शिक्षणसंस्था व आरोग्यसेवा चालवणे, किमान आवश्यक तेवढेच सरकारी उद्योग चालवणे, विकासकामांचे शक्य तितके ग्रामपंचायत व जिल्हा परिषदांकडे हस्तांतरण करणे, नव्या तंत्रज्ञानाचा व माहितीक्रांतीचा उपयोग करून उत्पादनांचे  विकेंद्रीकरण करणे इ.
2 राजकारणापलीकडे जाऊन समाजातील विद्वान, निस्वार्थी व राष्ट्रहितदक्ष लोकांची आचार्य परिषद बनवून त्याच्याकडून सल्ला घेत रहाणे
3 पक्ष, खासदारकी व मंत्रीपद इ. साठी 10 वर्षे ही कमाल मर्यादा ठरवणे
4 कोणतीही व्यक्ती ही पक्ष किंवा लोकप्रतिनिधित्व तसेच सामाजिक, आर्थिक वा धार्मिक केवळ एका पदावरच राहू शकेल. इतर सर्व पदांचा त्याग केला पाहिजे.
5 निवडणूक लढवण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता व अनुभव तसेच विषयप्राविण्याची पातऴी ठरविणे

5 comments:

  1. अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे.
    आपण सुचवलेले उपाय योग्य आहेत, पण हे उपाय प्रत्यक्षात त्याच राजकारण्यांनी आणायचे आहेत ज्यांच्या घराणेशाहीला आळा घालण्याचे हे उपाय आहेत. आपल्याच हाताने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारण्याचे काम ते करणार नाहीत.
    राजकारणातली घराणेशाही ही निवडणुकांच्या अर्थकारणाशी निगडीत आहे. निवडणुका खार्चिक होत आहेत आणि निवडून येण्याचा वापर हा पुढील निवडणुकांची तजवीज, तसेच कार्यकत्यांची बेगमी आणि हे सर्व करण्यासाठी स्वतःची आर्थिक अवस्था सुधारणे ह्यासाठी होत आहे. त्यामुळे गुंड+(प्रामुख्याने बांधकाम)व्यावसायिक असेच नेतृत्व स्थानिक स्तरावर निर्माण होत आहे. वरच्या स्तरावरच्या घराणेशाहीपेक्षा(उदा. राहुल गांधी) हि किडीसारखी खालून वर वाढत जाणारी घराणेशाही धोकादायक आहे. 'राजकीय नेतृत्व' अशी नवी जातच त्यातून निर्माण होण्याचा धोका आहे. आणि वरचढ पैसा किंवा हिंसा (हार्दिक, जिग्नेश इ.) असे केल्याशिवाय अन्य कोणाला ह्या जातीत प्रवेशच मिळणार नाही असे घडत आहे. शहर आणि ग्रामीण स्तरावरील अस्तित्वच नसलेले ideological पक्ष वगळता अन्य सर्व पक्षांत ही अवस्था दिसते आहे. पुढील दशकांत - दोन दशकांत ह्याच नेतृत्वातून खासदार निवडले जाणार आहेत.
    जनमताचा दबाव आणून वेळीच निवडणूक प्रक्रियेत बदल, जसे पक्षांचे फंडिंग पारदर्शी करणे (आधार जोडणी इ.) आवश्यक आहेत. पण ते किती पुरेसे पडतील ह्यांत शंकाच आहे.
    एका गंभीर समस्येबाबत विचारांना चालना देणारा लेख लिहिल्याबाबत आपले आभार.

    ReplyDelete
  2. माझे मत--
    श्री. राहुल गांधी यांना पक्षाध्यक्षपद मिळणे ही लोकशाहीची शोकांतिका नसून काँग्रेस पक्षाची शोकांतिका आहे. त्या पक्षातील सदस्यांनी घराणेनिष्ठा स्वेच्छेने स्वीकारली आहे कारण हे घराणे त्यांना स्वार्थकेन्द्रित कारभार करावायाची मुभा देते.
    काँग्रेसेतर राजकीय पक्षांमध्ये घराणेनिष्ठा नसली तरी व्यक्तीनिष्ठा प्रामुख्याने दिसते.
    त्यातल्या त्यात सांत्वनपर गोष्ट ही की भाजप मधील व्यक्तीनिष्ठा ही राष्ट्रनिष्ठ व्यक्तीशी आहे.
    भारतीय जनतेचा अलीकडील कल अभ्यासता निवडणुकीचा निकाल एकाच पक्षातील दुसर्या व्यक्तीला निवडण्याचा दिसत नाही तर दुसर्या पक्षाला निवडून देण्याचा दिसतो.
    अर्थात, यामागे अगतिकताच जास्त असते.
    वर्ष २०१७ च्या गुजराथ राज्यातील आत्ताच संपलेल्या निवडणुकीमध्ये मात्र जनतेने पूर्वीपेक्षा स्वच्छ आणि सूचक निर्णय दिला आहे.
    मतांची टक्केवारी जवळपास सारखी जरी दिसत असली तरी भाजपची निवडणुकां मध्ये जिंकलेल्या जागांमधील कामगिरी २००२ सालापासून उतरतीच राहिली आहे. मतांची टक्केवारी ही प्रामुख्याने शहरी भागातली आहे.
    वर्ष जिंकलेल्या जागा % मते
    २००२ १२७ ४९.८०
    २००७ ११७ ४९.१०
    २०१२ ११५ ४७.८५
    २०१७ ९९ ४९.१०

    याचा एक अर्थ असा दिसतो की ’अन्त्योदय’ किंवा ’ग्रामीण भागाचा निर्णायक विकास’ याकडे दुर्लक्ष भाजपनेही केले.
    भारतीय जनतेला खर्या (Genuine) विकासाची आस लावून विकासाचे प्रत्यक्ष परिणाम न दाखवल्यामुळे हा तारून नेणारा विजय भाजपला मिळाला आहे.
    जनतेने आपली नाराजी ५.५ लाखांपेक्षा जास्त -- NOTA -- मतांद्वारे आणि ज्या जागा भाजपने केवळ १००० ते २००० मतांनी जिंकल्या यांद्वारे व्यक्त केली आहे.
    जोपर्यंत एकात्म मानवताधारित भारतीय जीवन-तत्वज्ञान लोकांच्या मनात बिंबविले जात नाही तोपर्यंत भारतीय जनतेला लागलेली भोगवादी सवय जाणार नाही आणि मानव, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्व अनुक्रमाधारित विचार अंमलात येणार नाही.
    त्यामुळे राजकारणामध्ये घराणेशाही घुसण्याचा धोका कायम असणार आहे ज्याविरुद्ध सतर्क रहाण्यासाठी सरकारी प्रयत्नांची वाट न पहाता समविचारी संस्थानी स्वतंत्रपणे आणि बरोबरीने एकात्म मानवतावाद जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवून तो अंगिकारण्यासाठी उद्युक्त केले पाहिजे.
    कुठलेही सरकार आपला आवाका आणि त्याला अनुसरून आवश्यक आकार कमी करणार नाही.

    त्यामुळे, श्री. जवळेकरांनी सुचविलेल्या उपायांबरोबरीने खाली नमूद केलेले दोन मुद्दे उपयोगी होतील.
    १) सर्व लोकप्रतिनिधीपदे (नगरसेवकांपासून मंत्र्यांपर्यंत) पगारदार न ठेवता प्रत्यक्ष खर्चाधारित ठेवली पाहिजेत. त्यांना मुदतपूर्ती नंतरचे कुठलेही फायदे सुद्धा मंजूर असू नयेत.
    २) सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय आणि शासकीय खाती आणि त्यामधील अधिकारी, कर्मचारी यासर्वांना त्यांच्याकडे सुपूर्द केलेल्या कामाच्या अंमलबजावणी मधील चुकांसाठी जबाबदार धरणे आणि त्यामुळे होणार्या अपयशाची किंमत त्यांच्याकडून वसूल करून शासकीय तिजोरीमध्ये जमा करून घेणे हा पण एक उपाय प्रत्यक्षात आणला पाहिजे.

    भाजप ने धैर्यपूर्वक हे मुद्देलोक अनुमतीस टाकले पाहिजेत.

    ReplyDelete
  3. पक्षांतर्गत लोकशाही व तिथली घराणेशाही ह्यावर उपाय व्हायला हवा.

    ReplyDelete
  4. The foremost issue seems to be a correct understanding of the Functional Democracy. Today most of the print and electronic media has been professing that opposing the incumbent Government on every issue without suggesting alternatives is Democracy. It is surprising that many leading newspapers write that opposition parties failed or lost the opportunity to corner or fire the Government. As if the legislative assemblies and Loksabha are battlegrounds and legislators are warriors.
    It is also regrettable that the media does not differentiate between Government and Administration. An Administrative failures are also projected as Government policy failures.
    It is also felt that the Constitution has further cemented the walls between various casts and religions which has
    given rise to many organisations demanding special concessions based only on cats or religions. This has also given rise to many political groups formed solely for and by the particular cast instead of common people at large.

    ReplyDelete
    Replies
    1. कृपया विषयाला अनुसरून लिहावे ही विनंती.

      Delete